काळजावर दगड ठेवून पोटनिवडणुकीला सामोरे जात आहोत – शंकर जगताप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

काळजावर दगड ठेवून पोटनिवडणुकीला सामोरे जात आहोत – शंकर जगताप

चिंचवड (प्रबोधन न्यूज) - भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे. पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत अश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. “दुःख उराशी बाळगून या निवडणुकीला आम्ही जगताप कुटुंब सामोरे जात आहोत. आज लक्ष्मण भाऊंची उणीव जाणवते आहे. आमचा विजय नक्की होईल”, असा विश्वास दिवंगत आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

शंकर जगताप म्हणाले की, दरवेळेस उमेदवारी अर्ज भरत असताना उत्साह असायचा, तो भाऊंच्या जाण्याने कमी झाला आहे. काळजावर दगड ठेवून आम्ही पोटनिवडणुकीला सामोरे जात आहोत. आज वाहिनींचा अर्ज भरायला निघालो असलो, तरी त्या दुःखातून आम्ही सावरलो नाहीत. ते दुःख उराशी बाळगून निवडून येण्यासाठी सज्ज आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

तर, लक्ष्मण जगतापांच्या कन्या ऐश्वर्या म्हणाल्या की, दुःखातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. गेली तीस वर्षे आईने पडद्यामागे राहून वडिलांना पाठिंबा दिला. यामुळे आमचा विजय नक्की होईल, असे वाटते. वडिलांनी ज्या प्रकारे जनतेवर प्रेम केले, तसेच प्रेम आमच्यावर करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.