देशमुख लवकरच तुरूंगातून बाहेर येतील व त्यांची जागा भाजपचे नेते घेतील - संजय राऊत यांचा दावा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 14 - येत्या काही दिवसांत भाजपमधील काही नेते अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख हे बाहेर असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या हे दररोज उठून हा मंत्री आत जाणार तो मंत्री आत जाणार अशा वल्गना करत आहेत. अशा वल्गना करणाऱ्यांना आम्ही उद्ध्वस्त करू, महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आहे हे त्यांनी विसरू नये अशी धमकी शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मंगळवारी शिवसेना भवनात दुपारी चार वाजता आपण पत्रकारपरिषद घेणार असून, शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं उर्जाकेंद्र आहे असेही ते या वेळी म्हणाले. उद्याच्या पत्रकारपरिषदेला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार हजर असतील. त्यावेळी आम्ही काय बोलू, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असेल. या पत्रकारपरिषदेत आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ.
संजय राऊत यांचे मित्र असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत आहेत. मात्र, संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील पत्रकारपरिषदेत 'ईडी'वर आगपाखड केली होती. ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्रास देत आहेत. माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत राऊत काय बोलणार आहेत या कडे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे.