महाविकास आघाडीला बंडखोरीने ग्रासले; राहुल कलाटे यांची उमेदवारी कायम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाविकास आघाडीला बंडखोरीने ग्रासले; राहुल कलाटे यांची उमेदवारी कायम

पुणे/पिंपरी (प्रबोधन न्यूज) – चिंचवड पोटनिवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. पण राहुल कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता तिरंगी लढत अटळ आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तत्पूर्वी राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे म्हणून शिवसेनेचे नेते सचिन आहिर, खुद्द उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. कलाटे यांचे शिवसेनेतील पूर्वीचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कलाटे यांचे जवळचे मित्र नवनाथ जगताप यांच्या माध्यमातून गळ घालत राष्ट्रवादीने कलाटे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पण, कलाटे यांची समजूत निघाली नाही.

दुसरीकडे कसबा पोटनिवडणुकीतही उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते नाराज असल्याचे समजतंय. त्यामुळे तिथेही महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसबामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मतदार संघात सरळ लढाई होत आहे. असे असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील ही जागा लढवण्यासाठी इच्छुक होते. शिवसेनेकडून शहराध्यक्ष संजय मोरे तसेच विशाल धनवडे हे इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर शिवसेनेत मोठे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.

पक्षात प्रोटोकॉल पाळले जात नाहीत. असा आरोप करत कसबा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्ररक्षक असलेले विशाल धनवडे यांनी आपली नाराजी प्रगट केली आहे. विशाल धनवडे यांचे थेट शहराध्यक्षांसोबतच वाद झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की विशाल धनवडे हे आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. विशाल धनवडे यांना या निवडणुकीत 13 हजार 989 इतकी मते मिळाली होती. विशाल धनवडे हे पुणे शिवसेनेमधील एक मोठा चेहरा असून पुण्यातील शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला होता. धनवडे यांची कसबा विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर धनवडे यांची नाराजी महाविकास आघाडीला महागात पडू शकते. त्यामुळे आज सचिन अहिर यांच्या भेटीनंतर धनवडे काय निर्णय घेणार यावर कसब्याच्या पोटनिवडणुकीचे अनेक गणित अवलंबून असणार आहेत.