"दिशाभूलीला न जुमानता नागरिकांनी काँग्रेस पक्षावरील विश्वास कायम ठेवावा" - निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचे आवाहन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - मागील गेल्या दोन वर्षापासून अतिशय संघर्ष करत सातत्याने जनभावनेचा आधार घेत काँग्रेस पक्ष संघटनेने कार्य पद्धती मध्ये अमुलाग्र बदल करत दोन वर्षात सुमारे १२५० कार्यक्रम करत पिंपरी चिंचवड शहरात एक नवे अस्तित्व एक नवी ताकद आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केलेला आहे.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल,नागरिकांची दिशाभूल होईल, नागरिकांना पक्षाप्रती वेगळी भावना निर्माण होईल आणि एकंदरीतच एकसंघ असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये दुफळी माजली असल्याचे चित्र पक्षातील काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येत आहे.
शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये असलेल्या राजकीय पक्षांमध्ये सर्वात वेगळेपणाने आणि महत्वपूर्ण वाटचाल करत काँग्रेस पक्ष इथे पुन्हा बलाढ्य होतो आहे, नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे लोकांचा विश्वास काँग्रेस पक्षावर वाढत चाललेला आहे या परिस्थितीमध्ये आपण स्वतः पक्ष कार्यामध्ये सहभागी होऊन उत्तम यश काँग्रेस पक्षाला मिळेल याबाबतीत प्रयत्न करणे ऐवजी पक्षातील काही कार्यकर्ते हे स्वतःला एखादे पद मिळावे म्हणून केवळ याच कारणामुळे संपूर्ण पक्षाचे नुकसान करत आहेत. ते नुकसान दिशाभूल करणारे वक्तव्य करून केले जात आहे काहीही गैरसमज निर्माण करून देणारी पत्रे लिहून केले जाते आहे पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खोट्या भूलथापा दिल्या जात आहेत केवळ पैशाच्या जोरावर पक्षाची संघटना चालवून दाखवू शकतो ह्या चुकीच्या भावनेतुन काही कार्यकर्ते स्वतःला नेते समजून पक्षातल्या शिस्तीची तमा न बाळगता मनमानी वर्तन करत आहेत
.
राजस्थान मधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरा मधील एक व्यक्ती एक पद या ठरावाचा हवाला देत काही कार्यकर्ते हे विद्यमान काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे दोन पदे भूषवणे कसे गैर आहे हे सांगत फिरत आहेत, वर्तमानपत्रामधून याबाबतच्या बातम्या जाणीवपूर्वक दिल्या जात आहेत. वास्तविक पाहता काँग्रेस संघटनेमध्ये शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे इंटक प्रदेशाध्यक्ष हे पद हंगामी स्वरूपाचे असून इंटक ही काँग्रेस पक्षाची एक उपविभाग शाखा आहे. तो थेट काँग्रेसचा विभाग नसून उपविभाग असल्याने तो नियम या ठिकाणी लागू होत नाही एवढी साधी माहिती ज्या कार्यकर्त्यांना नाही त्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे काय भले होणार याची कल्पना आपणाला येऊ शकते.
राजस्थान येथील चिंतन शिबिरामध्ये इतरही अनेक ठराव करण्यात आले त्यापैकी एक म्हणजे सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहत पक्षाच्या बैठकांना गांभीर्याने न घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचा ही ठराव त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठरावांतर्गत चुकीचे वर्तन करणारे व स्व पक्षावर खुली टीका करणारे काही कार्यकर्ते यांच्यावर पक्षाची कारवाई होऊ शकते याचे देखील भान त्यांना राहिलेले नाही, गेल्या दोन वर्षापासून सातत्याने ते पक्षाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहत आहेत, काँग्रेस पक्षाने देशभरात ठरवून दिलेल्या महत्वाच्या अशा डिजिटल सभासद नोंदणी मध्ये देखील स्वतःची नोंदणी नसलेले काही लोक पक्षाचे नियम सांगू लागले आहेत या बाबत पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अगदी राहुलजी गांधी यांच्याबाबत असेल, प्रियंकाजी यांच्याबाबत असेल, सोनियाजी यांच्याबाबत असेल या आपल्या व इतरही नेत्यांच्या बाबतीमध्ये सुध्दा अनेक प्रसंगी चुकीच्या वक्तव्यांचा, चुकीच्या कारवाईचा, चुकीच्या तंत्रांचा अवलंब करण्यात आल्याने नागरिकांमध्ये क्रोधाचे वातावरण असताना त्या क्रोधाला आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणत असताना सुद्धा आणि आपल्या अति वरिष्ठ नेतृत्वावर सुद्धा टीका होत असताना यांनी स्वतःलाच महत्व देत त्या आंदोलनापासून पण दूर राहणं पसंत केले आणि पुढे आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, आम्हाला आदर सन्मान दिला जात नाही, बैठकीचा हॉल छोटा आहे, हवा लागत नाही, त्रास होतो, जिना छोटा आहे अशा पद्धतीची कारणे देत बैठकांना काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले.
एका बाजूला देशाचे नेते राहुलजी गांधी हे सुमारे चार हजार किलोमीटर पेक्षा जास्त ची पदयात्रा ऊन, पाऊस, थंडी आणि वारा या कशाची तमा न बाळगता देशातील देशवासियांना जोडण्यासाठी करत असतील आणि भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये या यात्रेचे कौतुक होत असेल आणि असा एक नवा आदर्श कष्टाचा, मेहनतीचा आपणाला घालून देणारे आपले नेते जर रस्त्यावर उतरून संघर्ष करत असतील आणि आपण एसी हॉल, मोठा जिना आणि इतर सुखसोयीची मागणी करत बैठकांना न येता घरी बसत असू तर निश्चितपणे आपण किती योग्य आहात याचे आत्मपरीक्षण अशा कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.
आपली कार्य कर्तुत्वाची, नेतृत्वाची पात्रता ही इतरांपेक्षा खुजी असल्याने आपल्याला संघटनात्मक ज्ञान कमी असल्याने, पैशाच्या जोरावर संघटना विकत घेऊ पाहणाऱ्या अशा प्रवृती एखाद्या कर्तुत्ववान व्यक्तीवर आरोप करून त्याच्या बरोबरीला जाता येते अशा केविलवाण्या भ्रमातून सध्या अपुऱ्या माहिती अभावी बोलणे, संघटनात्मक पक्षशिस्त माहीत नसणे, कार्यक्रमात सहभागी न होणे, आपल्याला पद मिळावे या साठी कसलेही उद्योग करून विद्यमान अध्यक्षावर खोटे आरोप प्रसिध्दी माध्यमासमोर करणे हे सर्व प्रकार करून नाहक पक्षाची बदनामी केली जात आहे व कष्ट करून स्वताला सिध्द करत पक्षात यश मिळवू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य देखील धोक्यात आणले जात आहे. हे सर्व प्रकार करणाऱ्यावर पक्ष शिस्तभंगाची गंभीर कारवाई केली जावी अशी मागणी पक्ष श्रेष्ठीं कडे करणार आहोत.
सर्व नागरिकांना नम्र आवाहन करत आहोत की, असल्या अफवांवर, चुकीचे संभ्रम पसरवणाऱ्यांवर आणि वातावरण दूषित करू पाहणाऱ्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, काँग्रेस पक्षावरील आपला विश्वास कायम ठेवावा, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपणाला सर्वांना विजय होऊन काँग्रेस पक्षाचे जनसुराज्य पुन्हा आणावयाचे आहे हा संकल्प मनात कायम ठेवावा.