वल्लभनगर एसटी आगारातून 13 बस सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वल्लभनगर एसटी आगारातून 13 बस सुरू
पिंपरी - 
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर येथील आगारातून काही प्रमुख मार्गांवर 13 बस सुरू झाल्या आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी केले आहे.
 
आगारातून यापूर्वी सोलापूरसाठी दोन बस सुरू झाल्या आहेत. तर, नाशिक फाटा येथून नाशिकसाठी 2 बस सोडल्या जात आहेत. पुण्यातील बस डेपोतून मुंबईसाठी सोडण्यात येणाऱ्या शिवनेरी बस चिंचवडस्टेशन आणि निगडी येथील थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी थांबविण्यात येत आहेत. आता अन्य आगारांच्या वल्लभनगर आगारात रात्री मुक्कामी असणाऱ्या बस दररोज सकाळी सोडल्या जात आहेत. त्यामध्ये विटा - 4 बस, जत - 3 बस तसेच आटपाडी, दापोली, अंबड, आजरा, तासगाव, देवरुख येथे प्रत्येकी एक बस सोडण्यात येत आहे. प्रवाशांना या बसच्या वेळांबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी 020-27420300 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
 
वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांचे 8 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वल्लभनगर आगारातील बस सेवा ठप्प पडली होती. निलंबन, बडतर्फीची कारवाई करुनही कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे 4 खासगी चालक घेऊन आगाराने काही बसेस सुरू केल्या आहेत.