गॅस सिलेंडरला पिंपरी महिला काँग्रेसने वाहिली अनोखी श्रद्धांजली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गॅस सिलेंडरला पिंपरी महिला काँग्रेसने वाहिली अनोखी श्रद्धांजली
गॅस सिलेंडरला पिंपरी महिला काँग्रेसने वाहिली अनोखी श्रद्धांजली
गॅस सिलेंडरला पिंपरी महिला काँग्रेसने वाहिली अनोखी श्रद्धांजली

पिंपरी, दि. १० मे - यूपीए सरकारच्या काळात चारशे रुपयांमध्ये मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मे २०२२ मध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीने महाग झाला आहे. केंद्र सरकारची चुकीची धोरणे, नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी आणि हुकूमशाही पद्धतीने सुरु असलेल्या केंद्रातील कारभारामुळे,  वाढत्या महागाईमुळे देशातील सव्वाशे कोटी जनता त्रस्त झाली आहे.

केंद्र सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. केंद्र सरकारचा रविवारी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गॅस सिलेंडरला हार घालून श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या आंदोलनात माजी नगरसेविका निर्मलाताई सद्गुरु कदम, नंदाताई तुळसे, निर्मला खैरे, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, छायाताई देसले, दिपाली भालेकर, सुप्रिया पोहरे, प्रियंका कदम, आशाताई भोसले, अनिता अधिकारी, वैशाली शिंदे, अनिता भिसे, भारतीताई घाग, राणी राठोड, रिटा फर्नांडिस, सीमा हलकट्टे, शिल्पा गायकवाड, सोनू दमवाणी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.