इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे -
इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून बाबासाहेबाना मानवंदना देण्यात आली.
तब्येत बिघडल्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे ५.०७ वाजता बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात शिवशाहीर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. यावेळी माणसे अध्यक्ष राज ठाकरे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
दुपारी १२ च्या सुमारास बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पार्थिव स्मशानभूमीत दाखल झाल्यावर सलामी देण्यात आली. राज्यातील सर्वच प्रमुख नेते बाबासाहेब पुरंदरेंच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते.
“पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.
“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.