'आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा'; जनता भाजपला जागा दाखवून देईल, कराडच्या सभेत पवारांचा इशारा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा'; जनता भाजपला जागा दाखवून देईल, कराडच्या सभेत पवारांचा इशारा

   कराड , (प्रबोधन न्यूज ) -    अजित पवार यांनी पक्षातून बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यांनी आज कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हान यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. भाजपाच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले आहेत. देशात, राज्यात संर्घष पेटवण्याचा हा प्रयत्न आहे. एकोप्यानं राहणाऱ्या समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून विरोधकांची सरकारं पाडली जात आहेत.   लोकशाहीच्या अधिकारांच जतन महत्त्वाचं आहे. आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे. जनता भाजपला जागा दाखवून देईल असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. शरद पवार यांनी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केले आहे. आता आवाज फक्त आपला आहे, जनता भाजपला जागा दाखवून देईल असा इशारा  शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान त्यापूर्वी साताऱ्यामध्ये शरद पवार यांचंं भव्य स्वागत झालं. अजित पवार यांच्यासोबत काल शपथविधी सोहळ्याला जे राष्ट्रवादीचे आमदार हजर होते त्यातील काही आमदार यावेळी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत आल्याचं पहायला मिळालं.