राहुल कलाटेंविरोधात एका शिवसैनिकाची बॅनरबाजी, ठरवले गद्दार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राहुल कलाटेंविरोधात एका शिवसैनिकाची बॅनरबाजी, ठरवले गद्दार

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, बंडखोरी करत शिवसेनेचे नेते असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला; परंतु त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने चिंचवड पोटनिवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे. आता एका शिवसैनिकाने राहुल कलाटे यांच्या विरोधात चिंचवड येथील चाफेकर चौकात बॅनर लावले आहे.

राहुल कलाटे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी मविआच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणीही सुरू होती; परंतु त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता मविआला फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच राहुल कलाटे यांच्याविरोधात अज्ञात व्यक्तीने चिंचवडमध्ये बॅनर लावले असून, नाव न घेता राहुल कलाटे यांच्यावर त्याने जोरदार निशाणा साधला आहे. खरा शिवसैनिक नावाने हे बॅनर त्याने लावलेले आहे.

या बॅनरवर म्हटले आहे की, एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून... नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी, एकदम ओक्के डोक्यातून... खरा शिवसैनिक या आशयाचा मजकूर लिहून. राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. या बॅनरची सद्या चर्चा सुरू झाली आहे.