स्टायलिश लूकसाठी घाला हेवी इयररिंग्ज! मात्र 'या' गोष्टी विसरू नका !

स्टायलिश लूकसाठी घाला हेवी इयररिंग्ज! मात्र 'या' गोष्टी विसरू नका !
मुंबई - 

फॅशनच्या बाबतीत, ऍक्सेसरीज आणि ज्वेलरीला तुमच्या आउटफिटशी मॅच करणे ही एक कला आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कोणत्याही आउटफिटला स्टायलिश लुक देऊ शकता. आजकाल दागिन्यांमध्ये फक्त सुंदर इयररिंग्ज घातल्यानेही तुमचा लुक पूर्ण आणि स्टायलिश होतो. इयररिंग्ज भारतीय पोशाख किंवा वेस्टर्न प्रत्येकाला आकर्षक लुक देतात. आजकाल हेवी इयररिंग्ज हा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या पारंपारिक पोशाखासोबत हे हेवी इयररिंग्ज कॅरी करू शकता, तर पाश्चिमात्य पोशाखांसह ते परिधान केल्याने कोणत्याही फंक्शनला प्रभावी लुक देता येतो. तथापि, आउटफिट्ससह कोणत्या प्रकारचे कानातले घालावेत याची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय हेवियररिंग्ज घालताना किंवा बदलतानाही कानाची काळजी घ्यावी. चला तर, जाणून घेऊया स्टायलिश लुकसाठी हेवी इयररिंग्ज कॅरी करण्याच्या काही टिप्स.

० ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी
हेवी ज्वेलरी आणि इयररिंग्ज कॅरी करून स्त्रिया त्यांच्या साध्या लुकला भारी स्टाइल देऊ शकतात. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही एथनिक आणि वेस्टर्न आउटफिट्ससोबत या प्रकारची ज्वेलरी कॅरी करू शकता. फक्त इयररिंग्जदेखील तुमचे सौंदर्य वाढवतील.

० मॉड्यूलर ज्वेलरी
तुम्ही वेस्टर्न वेअर किंवा साध्या टॉपसोबत मॉड्युलर ज्वेलरी कॅरी करू शकता. कापडाच्या रंगानुसार स्टोन मॅच करून अशा प्रकारचे दागिने घालता येतात.

० हेवी इयररिंग्ज 
तुमच्या कोणत्याही एथनिक पोशाखावर हेवी किंवा मोठे इयररिंग्ज खूप स्टायलिश दिसतात, विशेषत: कुर्ता सेट, पलाझो,शरारा इ. ते कॅरी करणे सोपे आहे, परंतु त्यांच्यामुळे लूक देखील सुंदर येतो. जड दिसणारे मात्र हलके वजनाचे इयररिंग्ज बाजारात मिळतील.

० मोती आणि डायमंड इयररिंग्ज 
मोती आणि डायमंड ज्वेलरी किंवा फक्त इयररिंग्ज तुम्हाला क्लासी लुक देतात. तुमच्या वेस्टर्न ड्रेससोबत असे हेवी इयररिंग्ज जरूर घाला.