महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश भैस यांची नियुक्ती
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
मुंबई (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अनेकदा वादग्रस्त विधान केल्याने त्यांना हटवण्याची मागणी अनेकदा झाली होती. त्यानंतर स्व:ता कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी राजीनामा दिला होती. अखेर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. आता त्यांच्या जागेवर झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल असतील. यासह राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये मोठे फेरबदल केले आहे.
राष्ट्रपती भवनाने देशातील १३ राज्यपालांची बदली केली आहे. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. २ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या रमेस बैस यांनी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.
त्यांनी ज्या नेत्यांचा पराभव केला त्यात काँग्रेसचे दिवंगत नेते व्हीसी शुक्ला आणि छत्तीसगडचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा समावेश होता. 1989 नंतर 1991 मध्ये रायपूरमध्ये बैस यांचा पहिल्याच निवडणुकीत शुक्ला यांनी त्यांचा 900 मतांनी पराभव केला होता. बैस यांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि ते जिंकले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने छत्तीसगडच्या सर्व तात्कालीन खासदारांना तिकीट नकारले होते. ज्यामध्ये रायपूरचे खासदार रमेश बैस यांचा देखील समावेश होता. याबाबत रमेश बैस यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. मात्र, त्यानंतर पक्षाने त्यांना त्रिपूराचे राज्यपाल केले. काहीकाळ त्रिपूराचे राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर झारखंड राज्याच्या राज्यपाल झाले.
याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून, लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून तर छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरचे राज्यपाल, मणिपूरचे गोपाल के. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालय येथे राज्यपाल म्हणून तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्या आली आहे.