नदीपात्रात राडाराडा टाकल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

नदीपात्रात राडाराडा टाकल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

       पिंपरी , (प्रबोधन  न्यूज )  -   पिंपळे गुरव येथे पवना नदीच्या पात्रात राडाराडा टाकल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील आरोग्य निरीक्षक अमोल गणपत गोरखे (वय 48) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ अंबादास मंजुळकर (वय 55), शिवाप्पा लकप्पा पुजारी (वय 32, दोघे रा. चतुशृंगी, पुणे), हनुमंत पटलाप्पा पवार (वय 32, रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन टेम्पो आणि एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिंपळे गुरव येथे पवना नदी पात्रात अनधिकृतपणे राडाराडा टाकला. नदीचे पाणी प्रदूषित करण्याची कृती केल्याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.