एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार; फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार; फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार केला. याबाबत विचारणा केली असता एकास शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जुलै ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मावळ तालुक्यातील परंदवडी येथे घडली.

प्रकाश बोदुराम चौधरी (वय 46, रा. वाकड) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी बाळू भोते, भरत बाळू भोते, बाळू महादेव भोते (सर्व रा. परंदवडी, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी यांनी परंदवडी येथील गट नंबर 275 मधील 120 गुंठे जखमी फिर्यादी यांना विक्रीचा व्यवहार केला. फिर्यादी चौधरी यांनी संभाजी यांना सदर जमीन यापूर्वी कोणास विकली आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्या, टेबल, प्लॉटिंगचे ग्रील आणि झाडांचे नुकसान केले. चौधरी यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. चौधरी यांच्या अगोदर अनुज गोयल यांच्या बरोबर करारनामा करून ती बाब लपवून ठेवत फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.