पुण्यात बसमध्येच चालकाचा 21 वर्षीय महिलेवर दोनदा बलात्कार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - पुण्यातील स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने बसमधील महिलेला पळवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नवनाथ शिवाजी भोग याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे राहणार्या २१ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती काम शोधण्यासाठी पुण्यात आले होते. ते राहण्यासाठी खोली शोधत होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड परिसरात झोपण्यासाठी ते जागा शोधत होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने दांपत्याला माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार असं सांगितलं. आरोपीवर विश्वास ठेवून दोघे बसमध्ये आराम करण्यासाठी गेले.
पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपीने संधी साधत बस दुसरीकडे नेली. ‘तू जर आरडाओरड केलीस तर जीवे मारुन टाकेन’ अशी धमकी त्याने महिलेला दिली. यानंतर स्वारगेटजवळ फुटपाथच्या बाजूला बस थांबून त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर कात्रज बसस्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा बलात्कार केला.
यानंतर आरोपीने महिलेला बसमधून खाली उतरवलं आणि तेथून पसार झाला. पीडित महिलेने स्वारगेटमध्ये तक्रार दिल्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्स चालकविरोधात गुन्हा दाखल केला. त्या आरोपीला बंगळुरु हायवेवर जेरबंद करण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं.