चंद्रकांत पाटलांची सुरसुरी - 'फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात !'

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चंद्रकांत पाटलांची सुरसुरी - 'फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात !'

पुणे -

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या राजकीय अतिशबाजीत आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही स्वतःची सुरसुरी पेटवली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर सतत आरोप करून चर्चेत राहणाऱ्या भाजप नेत्यांमधील अग्रेसर नाव असलेले चंद्रकांत पाटील यांनी आज सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी कार्यालयात दाखल झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. फरार घोषित होणं टाळण्यासाठीच देशमुख आज ईडीच्या  कार्यालयात प्रकट झाले असल्याची खोचक टीका पाटलांनी केली. 

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयये वसुलीचा आरोप आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर अनेकदा छापेमारी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या नागपूर, मुंबईतील मालमत्तांवरही टाच आणण्यात आली आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते ईडीसमोर आले नव्हते. यंत्रणाही त्यांचा शोध घेत होती. मात्र, ते यंत्रणांनाही सापडले नाही. त्यामुळे देशमुख नक्की कुठे आहेत? असा सवाल केला जात होता. तसेच देशमुख परदेशात पळून गेल्याचीही चर्चा होती. मात्र, आज अचानक देशमुख ईडी कार्यालयात आवतरले. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जातं.

देशमुखांवर ते गृहमंत्री असताना मुंबईचे तत्काली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच आरोप केले होते. सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहून देशमुख यांच्या वसुलीची पोलखोल केली होती. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.
अनिल देशमुखांचे ट्वीट
दरम्यान, अनिल देशमुख यांनी आज एक ट्विट करुन आपण ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असल्याचं ट्वीट दुपारी साडे बाराच्या सुमारास केलं होतं. ‘माननीय उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे’, असं देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.