आमच्याही हातात दगड असू शकतात - संजय राऊतांचा तिखट लवंगी बॉम्ब !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
संजय राऊत मीडियाशी बोलताना ही टीका केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे, केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे, पूर्वी असं कधी घडलं नाही. आता दोन वर्षात हे सुरू झालंय. हे महाराष्ट्राचं राजकारण नाही. आता यात शरद पवारांनाही घुसडले आहे. भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत, असं राऊत म्हणाले. राजकारण म्हटलं तर हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. विरोधकांना सांगतो. ज्यांचे घर काचेचे असते त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये. आमच्याही हातात एक दगड असू शकतो. आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही. आम्ही कमरेखालचा वार केला नाही. पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत म्हणाले.
भाजपने शरद पवारांवर घाणेरड्या पद्धतीने टीका केली आहे. ते त्यांचं अधिकृत मत आहे का याचा भाजपने खुलासा करावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी त्यावर बोलावं शरद पवार गेल्या 50 वर्षापासून संसदीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात अफू, गांजाची शेती पिकते असं देशाला वाटत आहे. मलिकांच्या जावयांवर खोटा खटला दाखल केला होता. त्यांची वेदना समजू शकतो. त्यांचे मुलगी आणि नातवंडांनी काय भोगलं हे आम्ही समजू शकतो. आम्ही त्यांच्या पाठी आहोत. त्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जातोय ही महाराष्ट्राची परंपरा नव्हती. राजकीय विरोधकांना खतम करण्याचं काम कधी झालं नव्हतं, असं ते म्हणाले.
दरम्यान, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मलिकांची माहिती धक्कादायक आहे. ज्यांच्यावर आरोप झाले ते खुलासा करतील. मला माहीत नाही. एनसीबीने चौकशी करावी. पुरावे असतील तर द्यावेत. पण महाराष्ट्रात चिखलफेक करू नये, असं त्यांनी सांगितलं.