राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांचीही खासदारकी जाणार?
राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा निर्णय दिल्लीत होणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. आता संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सूरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदीय सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. त्या पाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही खासदारकी जाण्याची टांगती तलवार आहे. संजय राऊत हक्कभंग प्रकरणात आता मोठी माहिती मिळाली आहे. राऊतांवरील कारवाईचा निर्णय आता केंद्राकडे टोलावण्यात आला आहे. राऊतांवरील कार्यवाहीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यसभेचा अभिप्राय मागवला आहे.
महाराष्ट्र विधानसभेकडून हे हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभेला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा निर्णय दिल्लीत होणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. आता संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे राऊतांच्या खासदारकीची भविष्य आता राज्यसभेच्या अभिप्रायावर ठरणार आहे.
संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. खारदार संजय राऊत यांनी केलेल्या राज्यसरकारवरील टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्याच बरोबर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.