भीषण कार अपघातात मिस केरळ विजेत्या-उपविजेत्या सौंदर्यवतींचा जागीच मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भीषण कार अपघातात मिस केरळ विजेत्या-उपविजेत्या सौंदर्यवतींचा जागीच मृत्यू

तिरुअनंतपुरम -

‘मिस केरळ 2019’ या सौंदर्य स्पर्धेची विजेती एन्सी कबीर (२४) आणि उपविजेती अंजना शाजन (२५) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री व्हिटिला-पलारीवट्टम महामार्गाच्या बायपासवर झालेल्या कार अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेमुळे या सौंदर्यवतींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहतेही शोकाकुल अवस्थेत आहेत. अपघातात झालेल्या कारच्या चुराड्याची भीषण दृश्यं समोर आली आहेत.

केरळ जिल्ह्यातील चक्करापरंबू येथील हॉलिडे इनजवळ एका दुचाकीला धडक दिल्यानंतर एन्सी आणि अंजना प्रवास करत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दोन्ही सौंदर्यवतींचे मृतदेह त्याच रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. एन्सी कबीर थिरुवनंतपुरम, तर अंजना शाजन ही त्रिशूर येथील रहिवासी होती. दोघी आपल्या मूळ गावांमधून मॉडेलिंग फोटो शूटसाठी कोची येथे आल्या होत्या. 2019 या वर्षी ‘मिस केरळ’ या सौंदर्य स्पर्धेत एन्सी कबीर विजेती, तर अंजना शाजन उपविजेती ठरली होती.

थ्रिसूरला जात असताना चक्करापरंबू जंक्शन या अपघात प्रवण भागात बाईकस्वाराला वाचवण्याच्या त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. धडकेनंतर कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातातील एक प्रवासी गंभीर जखमी असून अन्य एकाची प्रकृती स्थिर आहे. पलारीवट्टोम येथील ईएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कारमधील अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर दुसऱ्याची प्रकृती स्थिर आहे. पालरीवट्टम पोलिसांनी सांगितले की, ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला, तो जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन पळून गेला.