अजित पवार यांची विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. अखेर आज अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व आमदारांनी अजित पवार यांना विरोधीक्षनेते पसंती दर्शवली होती. त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते आता देवेंद्र फडणवीस यांची जागा घेतील.
विरोधी पक्षनेते निवडीची जबाबदारी शरद पवारांनी चार नेत्यांवर सोपवली होती. विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे यांनी एकत्र बसून नाव निश्चित करण्याचे शरद पवारांनी आदेश दिले होते.
अजित पवार यांना जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे चित्र होतं. सरकारमध्ये असतानाही अजित पवारांच्या दौऱ्यांचा, कामाचा आणि भाषणांचा बोलबाला राहिला आहे. तसेच अजित पवारांचं आजचं विधानसभेतलं भाषणही चांगलेच गाजले आहेत. अजित पवारांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. सरकारला घाम फोडण्याची ताकद ही अजित पवार यांच्यात असल्याचे अनेक आमदारांचे मत आहे.
तसेच विविध खात्यांच्या कामांचा अनुभव हा अजित पवारांच्या कामी नक्कीच येणार आहे. अजित पवारांची शिस्तही सर्वांनाच भावते, कधी कधी ते एखाद्या सभेच्या स्टेजवरून आपल्याच कार्यकर्त्यांना खडे बोलही सुनावताना दिसून येतात. त्यामुळे अजित पवारांचा हा धडाडीपणा आणि अनुभव पाहून त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार असे जाणकारांनी मत व्यक्त केलं होतं.