पतंजली युवा भारत व नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस साजरा

पतंजली युवा भारत व नगरसेविका  शर्मिला  बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने  योग दिवस साजरा
     पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -     21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी भारतातल्याच नव्हे तर जगातील सर्व नागरिकांना योगाचे महत्त्व पटावं म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 21 जून हा जागतिक योगा दिन साजरा करण्याचे निश्चित केलं आणि तो जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा होऊ लागला.
पतंजली युवा भारत व नगरसेविका  शर्मिला राजेंद्र बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गा टेकडी उद्यान, निगडी येथे १८ ते २१ जून २०२३ दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव निमित्ताने समग्र योगसाधना चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.