सासू-सुनेचे नातेसंबंध बनवायचे आहे मजबूत तर 'या' गोष्टींचा अवलंब करा !

सासू-सुनेचे नातेसंबंध बनवायचे आहे मजबूत तर 'या' गोष्टींचा अवलंब करा !

नवी दिल्ली  -

लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, प्रत्येक मुलीला नवीन घरात जुळवून घ्यायला वेळ लागतो. तिला घरातील सर्व सदस्यांशी जुळवून घ्यावे लागते. विशेषतः सासू-सासऱ्यांसोबत. त्याचबरोबर सासूसुद्धा काळजी करते की नवीन सून घरात कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जाऊ नये. पण तरीही, कालांतराने, दोघींमध्ये संघर्ष निर्माण होतात, जे त्यांचे संबंध बिघडवतात. मात्र, काही छोट्या छोट्या गोष्टी दोघींनी लक्षात ठेवल्या तर गुंतागुंतीचे दिसणारे सासू-सून संबंध मधुर आणि मजबूत बनवता येतील.

० एकमेकींशी मैत्री करा
नातं घट्ट करण्यासाठी सासू-सुनेला एकमेकांना आपली मैत्रीण बनवावी लागेल. जेव्हा दोघेही एकमेकांसोबत मैत्रीण म्हणून त्यांच्या गोष्टी शेअर करतील, तेव्हा भांडण, मतभेद, वाद वगैरे काहीच राहणार नाही.

० एकमेकांना महत्त्व द्या
सासू-सून यांचे नाते अत्यंत नाजूक असते. हे नातं चांगलं बनवण्याची जबाबदारी जितकी सासूची आहे तितकीच सुनेचीही आहे. जर तुमची सून काम करत असेल, तिला घरकामासाठी जास्त वेळ काढणे कठीण होत असेल, तेव्हा सासूने आपल्या सुनेच्या कामाला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सुनेनेही आठवड्याच्या शेवटी सासूबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे दोघांमधील बंध अधिक दृढ होईल.

० गैरसमज दूर करा
कुटुंब म्हटले कि भांड्याला भांड लागतंच. काही नात्यांमध्येही असेच घडते. एकत्र राहण्यामुळे काही गोष्टींवर वाद किंवा गैरसमज होणे स्वाभाविक आहे, पण ते जास्त वाढू देऊ नका. अशा परिस्थितीत सून आणि सासू या दोघींनीही आपला अहंकार बाजूला ठेवून एकमेकींशी बोलले पाहिजे.

० गोष्टी शेअर करा
सासू-सासऱ्यांनी नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. असे केल्याने दोघींमधील अंतर कमी होईल आणि त्या  एकमेकांना त्यांचे आनंद, दुःख आणि नाराजी उघडपणे सांगू शकतील.