पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कमर्चारी महासंघ निवडणूक जाहीर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला निवडून देण्याचे झिंजुर्डे यांचे आवाहन
पिंपरी, दि. 22 - शुक्रवार, दिनांक २५ फेब्रुवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची सन २०२२-२०२४ या कालावधीसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे पॅनलप्रमुख श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे हे अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची स्थापना सर्व कर्मचाऱ्यांचे संघटीत प्रश्न सोडविणे, कामगारांना चांगल्या प्रकारचे जीवनमान देणेकामी प्रशासनाकडून चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन घेणे इत्यादी कामी सन २००२ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही कामगार संघटना मान्यताप्राप्त झाली असून स्व. शंकर (आण्णा) गावडे, शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे, मनोज माछरे, दिपक गळीतकर, हनुमंत लांडगे, पद्मा कांबळे आदी अभ्यास व अनुभवी व्यक्तींमुळे आज अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उदा. मनपा कर्मचाऱ्यांना वेळोवळी ५ वा वेतन आयोग, १० वेगळी व जादा वेतन, ५ व्या वेतन आयोगास समकक्ष ६ वा वेतन आयोग, मनपा कर्मचाऱ्यांकरीता ना नफा ना तोटा या तत्वावर महासंघ मेडिकल्सची स्थापना, अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता कॅशलेस धन्वंतरी स्वास्थ्य योजना, मनपा कर्मचाऱ्यांकरीता स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाची उभारणी इत्यादी कामे अत्यंत प्रभावीपणे साकारलेली आहेत.
गेल्या निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांच्या फरकाने स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला पराभवास सामोरे जावे लागले. परंतु गेल्या २ वर्षांत सदर पराभवाचा फटका मनपा कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला आहे.
वास्तविक माहे जून २०१९ मध्ये सातवा वेतन आयोग शासन मंजुरीकामी पाठविला असता निवडणुकीच्या तोंडावर तो चुकीच्या पद्धतीने मंजूर करून घेतला व त्याचा नाहक परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे.
७ व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी दुर्लक्षीत केली असून कर्मचाऱ्यांचे ते भत्ते वाढवून देणेकामी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार आहे.
तसेच सन २००५ नंतर मनपा सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनामार्फत नविन परिभाषीत अंशदान पेन्शन योजना लागु करणेत आली आहे. सदर पेन्शन योजना बंद करून पुर्वीची जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत दिनांक १९/०२/२०१९ रोजी मा. महापालिका महासभेची मान्यता घेतली असून सन २००५ नंतर मनपा सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करणेकामी माहे जुन २०१९ रोजी मा. आयुक्तांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत ७ वा वेतन आयोगाच्या शासनाकडील प्रस्तावामध्ये सुद्धा मंजुरी मिळणेकामीचा विषय घेण्यात आला आहे.
तसेच मनपा कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता बदलल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध राहणार आहोत. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लाड कमिटी शिफारशी पुर्ववत लागू करणेसंबंधी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करणार आहोत. यामध्ये गरज भासल्यास राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे कारण हा प्रश्न फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाच नसून महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका नगरपालिका, स्थानिक संस्थांचा आहे.
तसेच स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती भवनाच्या बांधकामामध्ये श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत त्याबाबत कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत.
मनपामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राथमिक शिक्षकांसाठी वैद्यकीय उपचारांची सेवा देणेकामी आम्ही कटीबद्ध असून मागील २ वर्षांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न प्राधान्याने करणार आहोत, असे शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.