वाघिरे टॉवर्स सोसायटीधारकांचा ड्रेनेजचा प्रश्न सुटला! - ड्रेनेज लाईन, काँक्रिटीकरणाचे काम सुरू - भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once



 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   नेहरुनगर येथील वाघिरे टॉवर्स सोसायटीच्या रस्त्यावरील काँक्रेटिकरण आणि ड्रेनेजलाईचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील सुमारे दीड हजार रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हे काम हाती घेण्यात आले. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी वाघिरे टॉवर्स सोसायटीचे चेअरमन तुषार वाघिरे, सामाजिक कार्यकर्ते फारुक इनामदार, अशोक देशमुख, जावेद इनामदार, विजय जमदाडे, अजय जुनावणे, सचिन शिंदे, मंगेश कुलकर्णी आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तुषार वाघिरे म्हणाले की, वाघिरे टॉवर्स नेहरूनगर सोसायटी मधील काँक्रिटीकरण आणि अंतर्गत संपूर्ण ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आमदार लांडगे यांना विनंती करण्यात आली होती. या सोसायटीमध्ये सुमारे १३० सदनिका आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोसायटीधारकांना विविध पायाभूत सोयी-सुविधांच्या समस्या होत्या. त्याबाबत आमदार लांडगे यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. काँक्रिटीकरण आणि ड्रेनेजलाईनचे काम महिन्याभरात पूर्ण होईल. आमदार लांडगे यांच्या माध्यमातून नेहरुनगर, उद्यमनगर, अजमेरा या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.

"भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारक, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम प्राधान्य दिले आहे. सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यामुळे सोसायटीधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पूर्णवेळ अधिकारी नियुक्त केला आहे. नागरी समस्यांबाबत सोसायटीधारकांनी ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93799 09090’ वर संपर्क करावा आणि आपली तक्रार नोंदवावी. त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत."
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.