या घरगुती टिप्सचा अवलंब करून स्वयंपाकघरातील काम सोपे करा

या घरगुती टिप्सचा अवलंब करून स्वयंपाकघरातील काम सोपे करा

नवी दिल्ली - 

घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या व्यवस्थित न ठेवल्यास त्यामध्ये किडे येतात किंवा त्या खराब होतात. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघरातील काम सोपे करू शकता-

० हरभऱ्यात अळी होणे 
बराच काळ डब्यात ठेवलेल्या हरभरा किंवा चणा डाळीत किडे पडतात. किडे टाळण्यासाठी डाळीच्या डब्यात अर्धा चमचा मोहरीचे तेल टाकावे. असे केल्याने हरभऱ्याला अळी लागणार नाही आणि ते जास्त काळ टिकतील. 

० बिस्किटे दमट होणे 
बिस्किटे डब्यात ठेवल्यानंतर काही दिवसांनी ती ओलाव्यामुळे मऊ होतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही डब्यात बिस्किटे ठेवता तेव्हा त्यात साखरेचे थोडे दाणे टाका. असे केल्याने बिस्किटे दमट होणार नाहीत आणि कुरकुरीत राहतील.

० नवीन झाडूमधील धूळ 
बाजारातून खरेदी केल्यानंतर नवीन फुलांचा झाडूने घर साफ केले की त्यातून आणखी धूळ निघते. धुळीमुळे घर स्वच्छ होण्याऐवजी घाण होते. यावर उपाय म्हणजे झाडूला केसांप्रमाणे विंचरा. असे केल्याने झाडूवरील धूळ, कचरा  सहज निघून जाईल.