भरधाव ट्रकची बाप लेकाला धडक; जखमी मुलासमोर बापाने सोडला जीव

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भरधाव ट्रकची बाप लेकाला धडक; जखमी मुलासमोर बापाने सोडला जीव
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - तीन वर्षांच्या मुलाला बाप दुचाकीवरून घेऊन जात असताना दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. त्यात बाप लेक जखमी झाले. बापाला गंभीर दुखापत झाल्याने जखमी मुलासमोर बापाने जीव सोडला. दरम्यान, जखमी बाप लेकाला मरणासन्न अवस्थेत सोडून ट्रक चालक पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडवर घडली.
शिवशंकर वैजनाथ सूर्यवंशी (वय 46) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा सक्षम शिवशंकर सूर्यवंशी (वय 3) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश मते यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एचआर 38/वाय 8783) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर हे त्यांचा मुलगा सक्षम याला घेऊन दुचाकीवरून वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडने जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून शिवशंकर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात शिवशंकर आणि सक्षम हे दोघेही जखमी झाले. 
अपघात झाल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत न करता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या शिवशंकर यांचा जखमी मुलासमोर मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.