विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालय

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालय

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी बालचमुंचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. पहिल्याच दिवशी शाळेविषयी आपुलकी आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी 'माय फर्स्ट डे ऍट  स्कूल हा उपक्रम राबविण्यात आला. 
        शाळेमध्ये प्रवेश करणारे बालक व त्यांना शाळेत सोडायला आलेले पालक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशालेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. 
        शाळेच्या पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांकडून विविध ऍक्टिव्हिटी करून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या फिंगरप्रिंट्सच्या माध्यमातून संस्थेच्या सिम्बॉलची व ब्रीदवाक्याची ओळख करून देण्यात आली.
        प्रवेशद्वारावर फुलांची आरास, रांगोळी, फलकलेखन करून वातावरण प्रफुल्लित केले होते. विद्यार्थी जणू आपण सेलिब्रेटीच आहोत, अशा थाटात वावरत होते. सरस्वती पूजन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. 
        प्रणव राव यांनी बालचमुंना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. शाळेच्या पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे पुस्तकी शिक्षण न देता मुलांकडून काही ऍक्टिव्हिटीज करून घेण्यात आल्या. 
          मुख्याध्यापिका आशा घोरपडे,  मुख्याध्यापिका नीलम पवार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त व नियम याविषयी माहिती दिली.