दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या ३७ व्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबीर

दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या ३७ व्या स्मृतीदिनानिमित्त  रक्तदान शिबीर
   पिंपरी , (प्रबोधन न्यूज)  -   दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या ३७ व्या स्मृतीदिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानिमित्त "एक धाव पर्यावरणासाठी क्रॉसकंट्री स्पर्धा तसेच रक्तदान शिबीर, मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले. 
यावेळस "पिंपरी-चिंचवड "समाज भूषण पुरस्कार" पर्यावरण प्रेमी श्री हिरामण भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच नगरसेविका सौ. उषाताई
संजोग वाघेरे-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरव्यातून मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपूल पुलाचे व पावर हाऊस चौक ते पिंपळे सौदागर ब्रिज रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे भुमिपुजन करण्यात आली.
या कार्यक्रमास आमदार  आण्णा बनसोडे, माजी आमदार  गौतम चाबुकस्वार, महापौर उषा माई ढोरे, शहराध्यक्ष  अजित गव्हाणे, नगरसेवक  विठ्ठल नाना काटे, नगरसेविका  मंगला कदम,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर,  विशाल वाकडकर (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र), नगरसेविका उषा काटे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका  उषा संजोग वाघेरे-पाटील, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी  नगरसेवक प्रशांत शितोळे,  नगरसेवक अरुणभाऊ बोऱ्हाडे, प्रवक्ते  फझलभाई शेख, माजी  विरोधी पक्षनेता दत्ता वाघेरे,  नगरसेवक रंगनाथ कुदळे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, पवना बँकचे संचालक  शिवाजी वाघेरे, संचालक  बिपीन नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळाआप्पा वाघेरे,मा.नगरसेवक हनुमंत नेवाळे, माजी नगरसेवक  हरेश बोधानी, माजी  नगरसेविका शांती सेन,  विजुशेठ काटे,  दिलीप देवकर,  यशवंत साखरे कार्यक्रमाचे आयोजक - संजोग वाघेरे- पाटील व परिसरातील नागरिक व खेळाडू आदी उपस्थित होते.     रक्तदान शिबीरामध्ये १५० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.