पीसीसीओईने ग्लोबल इलेक्ट्रीक फॉम्युला स्टुडंट या संस्थेत सातवा क्रमांक मिळवला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी/पुणे - राष्ट्रीय इलेक्ट्रीक फॉम्युला रेसिंग स्पर्धेत पीसीसीओईच्या क्रटॉस टीमने व्दितीय क्रमांक तर ग्लोबल इलेक्ट्रीक फॉम्युला स्टुडंट या जागतिक संस्थेच्या यादीत सातवा क्रमांक मिळविला. ही स्पर्धा नुकतीच कोईम्बतूर येथे झाली. 'इलेक्ट्रीक फॉम्युला भारत २०२३' या राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवरील एकुण आठ पारितोषिके पटकावून स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी या टीमचे सर्व विद्यार्थी, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, यांत्रिक विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, विभाग मार्गदर्शक प्रा. निलेश गायकवाड व मनिष नारखेडे यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत देशभरातून नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) क्रटॉस रेसिंग इलेक्ट्रीक टीमने सांघिक गटात व्दितीय क्रमांक, इंजिनीअरिंग डिझाईन, कॉस्ट ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग, ओव्हर ऑल स्टॅटिक, ॲक्सलरेशन, स्किड पॅड, ऑटो क्रॉस, बॅटरी डिझाईन या गटांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावून प्रशंसनिय कामगिरी केली.
उच्च तंत्रज्ञान व संशोधनाव्दारे मानवी जीवनस्तर अधिक उंचावण्यासाठी पीसीईटीच्या सर्व महाविद्यालयतून 'प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला' प्रोत्साहन व विविध तांत्रिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. यापूर्वी २०१६, २०१७ आणि २०१८ मध्ये सलग तीन वर्षे क्रेटॉस रेसिंग टीमने सुप्रा एसएई इंडिया या राष्ट्रीय नामांकित स्पर्धेत प्रथम क्रमांकाची हॅट्रिक केली आहे. तसेच २०१९, २०२१ व २०२२ मध्ये इलेक्ट्रीक फॉम्युला भारत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. या कामगिरीची दखल घेत ग्लोबल इलेक्ट्रीक फॉम्युला स्टुडंट या जागतिक संस्थेने २८० जागतिक स्पर्धकांमध्ये टीम क्रटॉस रेसिंगला सातवा क्रमांक घोषित केला आहे. फॉर्म्युला स्टुडंट ही स्पर्धा ११ देशांमध्ये आयोजित केली जाते. जगभरातील शास्त्रज्ञ प्रदुषण ही समस्या सोडविण्यासाठी संशोधन करीत आहेत. त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक कार साठी शासन देखील प्रोत्साहन देत आहे.
या टीमचे नेतृत्व अभिषेक जाधव याने केले. अमन गोणकर, प्रणव कोलते, चिराग खर्चे, समृध्दी वोरा, ऋषीकेश कदम, मयुर पाटील, राधेश्याम नेमाडे, राहुल अडिप्पा, शौनक चौधरी, जयेश निकम, चिन्मय तिजारे, प्रणव महाजन, अनिकेत बराडे, ओहम दशमुखे, तेजस खैरनार, प्रथमेश पाटील, सम्मेद वानकुदे, अभिषेक भोसले, शुभांगी झाडे, वेदांत जगताप, अशुतोष जंगम, प्रथम कुरेकर, आदित्य भावसार, रुतुजा पवार, रोहन पाटील, स्वराज शेवाळे, अभिषेक त्रिपाठी, तनया पाचपुते, गौरी देशमुख, नेहा पाटील, तन्मय अहिरराव, भुषण पिसाळ, सई मुकाने, आदिती आहेर, निरभीक नविन, राधा कराळे, रुतुजा पाटील, ऋषीकेश वारपांडे, विनायक तुप्पड, इ. आर. हरी कृष्णन, अभिषेक माळी, इनवेश सोनार, ओम लोणकर, सुयोग माने, ध्रुव भट्ट, यशवंत कांबळे, आदिनाथ केळकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.