पैसा, प्रसिद्धी पेक्षा जीवाभावाचे चार उत्तम मित्र जोडा - गणेश शिंदे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
निगडी, दि. 23 मे आयुष्य हे क्षणभंगूर आहे. आयुष्याच्या सिनेमाला रिटेक घेता येत नाही. किंवा रिव्हर्स घेता येत नाही. आयुष्य खूप छोटे व सुंदर आहे. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. असा सल्ला व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी निगडी येथे दिला.
जयहिंद मित्र मंडळ ट्रस्ट आणि जय बजरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयहिंद व्याख्यानमालेत ते "जीवन सुंदर आहे" या विषयावर ते बोलत होते.
यावेळी माजी उपमहापौर राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम, ब्राम्हण महासंघाचे सचिन कुलकर्णी, अध्यक्ष राजेश फलके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाल व्याख्याता वैभव मदने याने संभाजी महाराजांवर मनोगत व्यक्त केले.
श्री शिंदे पुढे म्हणाले की, माणसांकडे अफाट पैसा असून देखील तो सुखी समाधानी नाही. केवळ पैशांमध्ये सुख नाही. असे असते तर सर्व श्रीमंत व्यक्ती सुखी असते ना. जुन्या काळात पैसा कमी होता मात्र आनंद खूप होता. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधा. आपल्यातील द्वेष, मत्सर, अहंकार बाजूला काढून आपण या जगात काहीच नाही असे समजून जगल्यास आनंदाची अनुभूती येईल. आपण भौतिक संपत्तीतच आनंद मानतो. पैशाच्या श्रीमंतीमध्ये जर आनंदाचे मूल्यमापन केले असते तर आपल्या शेजारील भूतानसारखा गरीब देश जगात सुखी म्हणून घोषित झाला असता का?
सुखाची व्याख्या आपण केवळ पैसा करून बसलो. भौतिक प्रगती प्रचंड झाली मात्र आपल्यामध्ये परिवर्तन घडून आले नाही. रस्ते सुधारले मात्र आपली चाल सुधारली नाही. मोबाईल आले मात्र आपली भाषा सुधारली नाही. बोलण्यात गोडवा आला नाही. जगणे कसे सुंदर होईल मग. सुख आणि आनंदाची गोळी मेडिकलमध्ये मिळत नाही. सुख दु:खाची संकल्पना आत्म्याशी संबंधीत आहे. मात्र आपण साधनांमध्ये सुख मानतो. आयुष्यात पैसा, प्रसिद्धी पेक्षा जीवाभावाचे चार उत्तम मित्र जोडा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश फलके यांनी तर सूत्रसंचालन व आभार मनोज बेताळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज भोगे, पंकज पाटील, सचिन मगदूम, आशिष शिंदे, केदार चासकर, रोहित सोनवणे, सुधीर सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.