मराठा - ओबीसी संघर्षाचा डाव हाणून पाडा - काशिनाथ नखाते

शरदचंद्र पवार  यांचे वक्तव्य वस्तुस्थिती

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे  हे उपोषणावर आजही ठाम असून आंदोलकावरील लाठीमार सरकारच्या अंगलट आलेला असून जरांगे यांच्या मागणीमुळे आरक्षण मिळणार आहे,कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे त्याला जातीनिहाय जनगणनेचा आधार असण्याची रास्त मागणी असताना दिशाभूल करून बेताल वक्तव्याद्वारे मराठा व ओबीसी संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न काही लोक मुद्दाम करत आहेत. मात्र तो संघर्ष आपण हाणून पाडावा असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांचा आज उपोषणाचा चौदावा दिवस असून त्यांनी घेतलेल्या  शासन जी आर बदलण्याच्या भूमिकावर ते आजही ठाम आहेत ते जग जाहीर चर्चा करत असून बंद दारा आड कधी करत नाहीत यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्यावर ठाम विश्वास असून त्यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार यात शंकाच नाही मात्र त्यांच्या आंदोलनाचे यश दडपण्यासाठी व त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत असून बेताल वक्तव्य करून या महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी मराठा आरक्षणातून मार्ग काढायचा असेल तर ५०    % ची मर्यादा १६ टक्क्यांनी वाढवून ६६ % आरक्षण करणे गरजेचे आहे तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजप व मित्रपक्षांची सत्ता असतानाही आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे . तामिळनाडू सरकारने आरक्षणाचे बंधन ७४ %  पर्यंत नेले आणि ते न्यायालयात  टिकले आहे कोणाच्या ताटातील भाकरी आम्हाला नको आहे, कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षणाची देण्यासाठी मर्यादा वाढवावी असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले आहे त्या वक्तव्याचा विपर्यास   करून राजकीय लाभाचा निष्फळ प्रयत्न काही लोक करत आहेत  असे मतही नखाते यांनी व्यक्त केले.