A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
रावेत येथील पीसीसीओईआर च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चार वर्षे भरपूर अभ्यास करावा. ही चार वर्षे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहेत असे प्रतिपादन रिलायन्स फायर प्रोटेक्शनचे रमेश दौंडकर यांनी व्यक्त केले.
पीसीईटीच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये पहिल्या वर्षाच्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दौंडकर बोलत होते. यावेळी प्रा. दिनेश अनंतवार, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा. तुषार गायकवाड, प्रा. प्रिया ओघे, प्रा. डॉ. समीर सावरकर, पालक प्रतिनिधी डॉ. रमेश राठोड, नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.
दिनेश अनंतवार म्हणाले की, अभियांत्रिकी शिक्षणाचा चार वर्षांच्या कालावधीत उत्तम, दर्जेदार ज्ञान संपादन करा. अभ्यासाचा कंटाळा करू नका. विविध स्पर्धा, चर्चासत्रात सहभागी व्हा. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील आणि भविष्यातील प्रश्न, समस्यांचा धीराने सामना करून आत्मविश्वास निर्माण होईल. आत्मविश्वासाच्या बळावर यशाला गवसणी घालू शकता याची खात्री आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाची सुरुवात आजपासून झाली आहे. आता भरपूर ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पीसीईटी कटीबद्ध आहे. या बाबत पालकांनी निश्चिंत राहून आपल्या पाल्याशी संवाद साधला पाहिजे. महाविद्यालय आणि पालक असे दोघे मिळून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवू असे डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.
डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्रा. डॉ. समीर सावरकर, प्रा. डॉ. रमेश राठोड, नितीन निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्र संचालन ओमकार पोटपल्लेवार, सृष्टि भोईर तर महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण यश वाघ, स्नेहा अढळराव यांनी केले. स्वागत प्रा. तुषार गायकवाड, आभार प्रा. प्रिया ओघे यांनी मानले.