महागाई विरोधात आता मनसेही उतरली, पिंपरीत केले आंदोलन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महागाई विरोधात आता मनसेही उतरली, पिंपरीत केले आंदोलन

पिंपरी-चिंचवड, दि. 25 मार्च – पाच राज्यांच्या निवडणुका पार पडताच पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅसच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर तर रोज वाढत आहेत. याचा परिणाम सर्व सामान्यांच्या जीवनावर झाला आहे. महिन्याचे बजेट कोलमडून पडले आहे. या महागाईच्या विरोधात आता मनसेनेही उडी मारली आहे. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की,  गेल्या 9 वर्षांपासून महागाईत वाढ होतच आहे. या पूर्वी काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा त्यांनी  महागाई आटोक्यात आणली नाही. त्यामुळे लोकांनी मोदी सरकारला निवडून दिले. पण काँग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारे भाजप महागाईच्या सर्व सीमा ओलांडत आहे. घरगुती सिलिंडर, खाद्य तेल, पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य व रोजच्या वापरण्यात येणारे वस्तूंचे भाववाढ करून गोरगरिबांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नागरिकांची कोविडच्या लाटेतून सुटका झाली, पण महागाईची लाट कायम ठेवली आहे. त्यामुळे महागाई विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात राजू सावळे, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, दत्ता देवतरासे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगिता देशमुख, अनिता पांचाळ, सुजाता काटे, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, अनुज महाजन, प्रफुल्ल कसबे, नितीन चव्हाण, नारायण पठारे, आकाश पांचाळ, राजू भालेराव, विनोद भंडारी, नारायण पठारे, फैयाज नदाफ, अॅलेक्स मोजेस, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, हेमंत डांगे, बाळा दानवले, शिशिर महाबळेश्वरकर, जय सकट, प्रदीप घोडके, निलेश नेटके, आकाश लांडगे, रॉबिन त्रिभुवन, विशाल साळुंखे, गणेश उज्जनकर, परमेश्वर त्रिमले, नीरज कांबळे, कृष्णा महाजन, स्नेहल बांगर आदी सहभागी झाले होते.