सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १ जुलैला पार पडणार पदवीप्रदान सोहळा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १ जुलैला पार पडणार पदवीप्रदान सोहळा

  पुणे , (प्रबोधन न्यूज )   -   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवीप्रदान समारंभ १ जुलै २०२३ रोजी  संपन्न होणार आहे. विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहात दुपारी २.३० वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. सदर पदवीप्रदान सोहळा राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सन्माननीय अतिथी म्हणून तर भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी श्रीमती चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विद्यापीठ अधिकार मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्यासह विध्यार्थी उपस्थित राहणार आहे.

एप्रिल / मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण १ लाख २१ हजार २८१ विध्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये पदवीचे ९३ हजार ९८३, पदव्युत्तर पदवी २६ हजार ४५४, पीएचडी ४३८, एमफिलचे ११ असे एकूण १ लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

३० विद्यार्थी आणि ४० विद्यार्थिनी असे एकूण ७० विध्यार्थ्यांना कुलपती यांच्या हस्ते १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. सन २०२१-२२ मध्ये शैक्षणिक, खेळ व इतर कलागुणांमध्ये वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरी करणारी रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणेची विद्यार्थिनी अदिती कालीदास भोईटे हिला भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाने सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सुवर्णपदक प्राप्त विध्यार्थ्यांना समारंभात तर उर्वरित विध्यार्थ्यांना टपालाद्वारे पदवी त्यांच्या पत्यावर पाठविण्यात येईल.