बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार चौकातील वाहतुकीत मोठा बदल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे , (प्रबोधन न्यूज ) - पुणे शहरात २९ जून रोजी म्हणजेच उद्या बकरी ईद साजरी केली जाणार आहे. त्यानिमीत्त मुस्लीम बांधव एकत्र येऊन आप-आपल्या मोहल्यातील मशिद व ईदगाह मैदानावर / सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यामध्ये पुण्यातील गोळीबार चौकातील ईदगाह मैदानवर परिसरात मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. मैदानावरील आणि चौकातील गर्दी टाळण्यासाठी २९ जून रोजी गोळीबार मैदान चौकातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
ळीबार मैदान चौक पुणे येथील ईदगाह या ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून नमाज पठण पुर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक तसेच ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतुक आवश्यकते नुसार बंद करण्यात येणार आहे.
हे मार्ग राहणार बंद !
बंद मार्ग : गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक नमाज पठण काळात सकाळी ०६.०० ते ११.०० वा. चे वेळेत पुर्णता बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : लुल्लानगरकडून येवून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगला चौक - नेपीयर रोड - मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा वानवडी बाजार चौक - भैरोबानाला येथुन किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : सेव्हन लव्हज चौका कडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : सॅल्सबरी पार्क सीडीओ चौक - भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातुन गोळीबार चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा जुने कमांड हॉस्पीटल मार्गे इच्छितस्थळी जातील.
बंद मार्ग : भैरोबानाला ते गोळीबारकडे जाणारी वाहतुक भैरोबानाला येथे बंद करुन एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येईल.
पर्यायी मार्ग : प्रिन्स ऑफ वेल रोडने (एम्प्रेस गार्डन रोड) किंवा भैरोबानाला- वानवडी बाजार - लुल्लानगर येथून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : कोंढवा परीसरातून गोळीबार कडे येणा-या सर्व जड माल वाहतुक वाहने, प्रवासी वाहतुक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करून लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौकामार्गे किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.