पुण्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने मुलगा गंभीर जखमी

धायरी परीसारात सायकल चालवत असलेल्या एका अल्पवयीन मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला असून, तो सायकलवरून खाली पडल्याने सायकलचे हँडल पोटात घुसून त्याचे आतडे बाहेर आले.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने मुलगा गंभीर जखमी

पुणे - पुण्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहे. यात नागरिक जखमी झाल्याच्या घटना देखील पुढे आल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील धायरी परिसरात उघडकीस आली असून यात भटक्या कुत्र्यांनी सायकल चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याने त्याच्या पोटात सायकलचे हँडल घुसून त्याचे आतडे बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली. हा मुलगा बराच वेळ रस्त्यावर पडून होता. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी रुग्णवाहिका बोलवून मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अर्जुन सुपेकर (वय १२ रा. लेन नंबर २३ ब गणेश नगर, धायरी ) असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. अर्जुनच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याचा हात फॅक्चर झाला आहे. मिळालेल्या माहिती अशी की, धायरी परिसरात गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. अर्जुन हा सकाळी त्याच्या घरासमोर सायकल चालवत होता. यावेळी काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यात अर्जुन हा खाली पडल्याने त्याच्या सायकलचे स्टँड ही त्याच्या पोटात घुसल्याने त्याचे आतडे बाहेर आले. यानंतर अर्जुन हा मदतीसाठी विव्हळत होता.

मात्र, बराच वेळ तो त्या ठिकाणी पडून होता. ही घटना येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोफळे यांना कळली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून अर्जुनला दवाखान्यात भरती केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली आहे.