जीव गमावलेल्या मुलीला न्याय मिळणार का?
रुग्णालय आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
खराळवाडीतील नागरिकांचा पोलीस-प्रशासनापुढे तीव्र आक्रोश
(टीम प्रबोधन)
पिंपरी/पुणे - पिंपरीमधील खराळवाडी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू, त्या विषयी होणारी चर्चा, पोलिसांची उदासीनता आणि या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी एका प्रख्यात रुग्णालयाचा कथित सहभाग या साऱ्या गोष्टींनी सांस्कृतिक राजधानी असणार पुणे झाकोळून गेले आहे. या घटनेची दखल काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी न घेतल्याने तसेच मुलीच्या आईचे मौन यांमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
खराळवाडीतील एका १७ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. एका इमारतीच्या खाली ती पडलेली होती अशी चर्चा आहे. त्या नंतर तिला पुण्यातील एका प्रख्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाने तिचा मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. तिथे तिचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह मुलीच्या आईच्या ताब्यात देण्यात आला.
त्यानंतर आईने व मुलीच्या बहिणींनी तिचा मृतदेह आपल्या घरी (खराळवाडी) आणला. त्या वेळी मृतदेहाची अवस्था पाहून आणि मिळालेल्या माहितीवरून नातेवाईक आणि शेजारपाजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला, तसेच पोलीस तपास करण्याची मागणी केली.
या घटनेची वाच्यता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. वायसीएममध्ये तिचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, प्रदेश सेक्रेटरी स्वाती शिंदे, काँग्रेसचे कार्यकर्ते व नातेवाईक यांनी येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
या घटनेनंतर काही मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार करण्यात आले त्या वेळी त्यांनी पोलिसांना का कळवले नाही या प्रश्नातच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे.
मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतरही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आकस्मिक मृत्यूच्या ऐवजी खुनाचा गुन्हा का नोंदवण्यात आला नाही ?
पोलिसांना रुग्णालयाने न कळविल्यामुळे या रुग्णालयाविषयी संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. या रुग्णालयाने या तरुणीवर झालेले अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी उपचाराचे नाटक केले अशीही चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी घेतलेल्या नरो वा कुंजोरो वा भूमिकेमुळे या प्रकरणात बड्या हस्तींचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गृहविभागाची प्रतिष्ठा पणाला
- महिला आयोग, राज्याचे गृहखाते, पुणे पोलीस आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाणार का? जर या मुलीचे खरेच बरेवाईट केले असेल तर दोषींना शिक्षा होणार का? या नराधमांना शिक्षा होऊन या मुलीला न्याय मिळणार का असे सवाल केले जात आहेत.
(क्रमशः)