यापूर्वी मलाही धमकावण्याचे प्रकार, पण घरापर्यंत कधी प्रकार आला नव्हता – वसंत मोरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

यापूर्वी मलाही धमकावण्याचे प्रकार, पण घरापर्यंत कधी प्रकार आला नव्हता – वसंत मोरे

पुणे, (प्रबोधन न्यूज) - रुपेशला आलेल्या धमकीनंतर मी आणि माझे कुटुंबीय व्यथित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली आहे. मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही धमकी नेमकी कोणी आणि कोणत्या कारणाने दिली याचा उलगडा अद्याप झालेला नाही, वसंत मोरे म्हणाले, की यापूर्वी मला अगदी वेपन दाखवून धमकवण्याचे प्रकार झाले आहेत. पण माझ्या घरापर्यंत कधी हा प्रकार आला नव्हता. यासर्व प्रकारानंतर आम्ही डिस्टर्ब झालो आहोत, असे ते म्हणाले. याप्रकरणी कोणावर संशय नाही, मात्र पोलिसांत तक्रार दिली आहे, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा ज्याठिकाणी घेतला त्या थोरवे शाळेजवळ हा प्रकार घडला. सकाळी लावलेली गाडी संध्याकाळी सहावाजता तेथील काम उरकल्यानंतर तो परतला होता. दोघेही आम्ही सोबतच होतो. तो त्याच्या मित्रांबरोबर मोरेबागला गेला आणि मी कात्रजला आलो. नंतर पंधरा-वीस मिनिटांनी त्याचा फोन आला, की मला बोलायचे आहे, प्रॉब्लेम झाला आहे. मग त्याला विचारल्यावर त्याने चिठ्ठीसंबंधी सांगितले. व्हाट्सअॅपवर त्याचा फोटो पाठवला. सावध राहा रुपेश असे त्यात लिहिले होते. ही चिठ्ठी गाडीच्या वायपरला लावली होती, असे वसंत मोरे म्हणाले.

आपण राजकारणात असल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होत आहे. मात्र ज्याने कोणी हे केले असेल त्याने समोर यावे. काही चुका झाल्या असतील तर बोलू. पण उगाचच काहीतरी वेगळे करायचे, मला आणि माझ्या कुटुंबाला डिस्टर्ब करायचे, अशा गोष्टी करून काहीच साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, याविषयी त्यांनी काल फेसबुक पोस्टही केली होती. भारती विद्यापीठ पोलीस आता याप्रकरणी तपास करत आहेत, असे त्यात ते म्हणाले होते.

फेसबुकवर मोरे यांनी पुढील पोस्ट केली होती –

मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...

आमचेही अगदी तसंच आहे,

पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही...

राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही...

गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,

पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे...

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली,

त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये

"सावध रहा रुपेश"

आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली...

तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ?

हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय...

आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?

हे का तेच कळत नाही...

भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत...

तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय...

बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप

वसंत ( तात्या ) मोरे आहे...!