जगण्यापेक्षा मरण स्वस्त - अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र काँग्रेस

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जगण्यापेक्षा मरण स्वस्त - अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र काँग्रेस
जगण्यापेक्षा मरण स्वस्त - अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र काँग्रेस
जगण्यापेक्षा मरण स्वस्त - अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र काँग्रेस
जगण्यापेक्षा मरण स्वस्त - अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र काँग्रेस

पुणे, दि. 11 मे - मोदी सरकारच्या कारकिर्दीत वारंवार होणारी गॅस दरवाढ व दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाईच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची संभाजी उद्यान येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेला फसवले आहे. युक्रेन आणि रशियाचे युध्दाचे कारण सांगून पेट्रोल - डिझेलची दरवाढ केली. या आधीही कच्चे तेलाचे भाव कमी असताना सुध्दा सातत्याने पेट्रोल - डिझेलची दरवाढ करीत होते.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढले आहे. गव्‍हाचा साठा सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढाच शिल्लक आहे. त्यानंतर त्याचीही टंचाई होणार आहे. गुजरात सरकारला १ हजार कोटी केंद्र सरकारने दिले परंतु महाराष्ट्राला काही दिले नाही. अशा पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार भेदभाव करत आहे. मोठ्या गाजावाजा करून उज्ज्वला गॅस योजनेची घोषणा केली आणि गरीबांना सबससिडी दिली परंतु निवडणुकी नंतर काही घोषण न करता परस्पर सबसिडी बंद केली.

काँग्रेस सरकारच्या राजवटीत ज्या गोरगरीबांना गॅस परवडत नव्‍हते ते रॉकेलचा वापर करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोदी सरकारने रॉकेल बंद केले व वारंवार घरगुती गॅस वाढवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे आता गरीब महिलांना चूल पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. एप्रिल महिन्यामध्ये देशाची महागाई 7.5 % पर्यंत गेली होती आणि पुढेही वाढणार.

मोदी सरकार लोकांची हाडे मोडून कबड्डी खेळण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारचे अच्छे दिन फक्त १० ते १२ उद्योगपतींसाठीच आहे. देशाच्या अर्थव्‍यवस्थेकडे दुर्लक्ष करून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यात मग्न आहेत. तरुणांना रोजगार नाही. सामान्य माणासाच्या अन्न, वस्त्र व निवारा या तीन प्रमुख गरजा आहेत. मोदी सरकारच्या राजवटीत या प्रमुख गरजा सुध्दा मिळत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने ससंदेत व संसदेच्या बाहेर महागाईवर सरकारला जाब विचारला आहे. आज ही पत्रकार परिषद पुणेकरांच्या उपस्थितीत घेवून मोदी सरकारने सरकारने केलेल्या महगाईला काँग्रेस पक्षातर्फे निषेध करीत आहोत.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार- प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गटनेते आबा बागुल, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, पुजा आनंद, अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, वैशाली मराठे, रमेश अय्यर, संगिता तिवारी, द. स. पोळेकर, शानी नौशाद, रजनी त्रिभुवन, प्रविण करपे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, प्रियंका रणपिसे, ॲड. राजश्री अडसूळ, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, अविनाश अडसूळ, सुरेखा खंडागळे, ताई कसबे, नंदा ढावरे, ज्योती परदेशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.