पुणे पुरंदर विमानतळासाठी मोठ्या हालचाली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे पुरंदर विमानतळासाठी मोठ्या हालचाली

   पुणे , (प्रबोधन न्यूज )  -   पुणे शहराचा विकास झाला. उद्योगासोबत शिक्षणाची नगरी म्हणून पुणे ओळखले जाऊ लागले. पुण्यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणारे अनेक जण आहेत. परंतु पुणे शहराला विमानतळ नाही. पुण्यात भारतीय हवाईदलाच्या असलेल्या लोहगाव विमानतळाचा वापर केला जातो. यामुळे पुणे शहरात विमानतळ निर्मिती करण्याची घोषणा अनेकवेळा झाली. परंतु त्यासाठी ठोस निर्णय झाला नाही. आता पुण्यातील पुरंदर विमानतळ निर्मितीसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्य सरकारकडून पुरंदरमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा आठ वर्षांपूर्वी होती. त्यासाठी सात गावांमधील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जागा संपादीत करण्यात येणार होती. त्यासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार, आणि भारतीय विमान प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला. परंतु भूसंपादन झाले नाही. आता विमानतळाच्या भूसंपादनासाठी 5,000 कोटी लागणार आहे. परंतु राज्य सरकार हा पैसा उभारु शकत नाही. यामुळे अदानी उद्योग सूमह हा निधी देणास तयार आहे.अदानी समूहासोबत पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम एमआयडीसी किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट कंपनीकडून होणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या दोन महिन्यात होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून विमानतळाला दिलेली परवानगी रद्द केली होती. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न पुन्हा रखडला होता. परंतु राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने त्याच जागेवर भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यात चांदणी चौक पुलाचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी अजित पवार यांनी विमानतळाची गरज बोलून दाखवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.