संप पुकारणाऱ्या नागपूरमधील २१९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संप पुकारणाऱ्या नागपूरमधील २१९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

नागपूर - राज्य सरकाच्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. बहुतांश कर्मचारी दुसऱ्या दिवशी बुधवारी कामावर परतले. त्यामुळे मुख्यालयासह झोन कार्यालयांतील थांबलेले कामकाज सुरळीत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, संपावर न परतणाऱ्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात इंटकशी संलग्नित नागपूर महापालिका कर्मचारी संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संपाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी तब्बल दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. संपामुळे झोन कार्यालय, मुख्यालयातील अनेक महत्त्वाच्या विभागाची कामे ठप्प झाली होती. शहरातील चार झोनमधील करवसुली थांबली होती.

त्यामुळे अनेकांना कर न भरता आला नाही. जन्ममृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता कर, नगररचना विभागाशी संबंधित कामांना ब्रेक लागला होता. मार्च महिन्याची लगबग सुरू असल्याने या विभागात मोठ्या संख्ये नागरिकांची गर्दी असते. बुधवारी संपावर गेलेले किमान सहा ते सात हजार कर्मचारी परतल्याने कामकाज पूर्ववत झाले. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

७५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर परतल्याने संपाचा दुसऱ्या दिवशी फारसा परिणाम जाणवला नाही, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यातच जे अजूनही संपावर परतले नाहीत अशा २१९ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे त्यांना चोवीस तासाच्या आत स्पष्टीकरण द्यावे, असेही पत्रात म्हटले आहे.