2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मविआचे जागा वाटप ठरले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मविआचे जागा वाटप ठरले

आता फक्त उमेदवार ठरवायचे बाकी आहे

लवकरच उमेदवारही ठरतील म्हणजे उमेदवारांना प्रचाराला वेळ मिळेल

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने मोट बांधली आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाला आतापासूनच सुरुवात केली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत शिवसेना २१, काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १९ अशाप्रकारच्या जागावाटपाचे सूत्र आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून एक वर्षे बाकी आहे हे विशेष.

महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांची काल बैठक पार पडली. सत्ताधारी पक्षांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी आतापासूनच लोकसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित झाल्यास त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना प्रचारात मिळेल यादृष्टीने आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.पोटनिवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.

मुंबई आणि उपनगरमधील लोकसभेच्या सहा जागांपैकी शिवसेनेला चार जागा देण्याबाबत चर्चा झाली. उर्वरित दोन जागांपैकी एक काँग्रेसला, तर एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याचे समजते. काँग्रेसने उत्तर मुंबई, तर राष्ट्रवादी काँग्रसने ईशान्य मुंबई लढवावी अशा प्रकारचा प्रस्ताव बैठकीत मांडला गेल्याची माहिती आहे.

राज्यात २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीमधील घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला होता. यासर्व पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत झालेल्या चर्चेत शिवसेनेला २१ जागा देण्याबाबत चर्चा झाली. भाजप आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये हिंदुत्व हा एक समान धागा असल्याने भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे जागावाटपात त्यांना जास्त जागा देताना, त्यांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद उभी राहिल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती आहे.

कोणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबतही जवळपास एकमत झाले असून, ज्या पक्षाचे जिथे प्राबल्य अधिक त्या जागा त्या पक्षाला देण्याचा निकष ठरवण्यात आला आहे. पाच ते सहा जागांबाबत एकमत न झाल्याने त्याविषयी पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.