अपहरण प्रकरणात सराईत गुंड बाळा वाघेरेला अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अपहरण प्रकरणात सराईत गुंड बाळा वाघेरेला अटक

पिंपरी - : चिंचवड शहरातील कुख्यात गुंड बाळा आप्पा वाघेरेला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैशांच्या व्यवहारातून व्यवसायिकाचे अपहरण करून सात लाखांची खंडणी मागितल्याने ही कारवाई केली आहे. बाळा आप्पा वाघेरे, हरीश चौधरी, राहून उणेचा आणि इतर एकाचा या गुन्ह्यात सहभाग आहे. यांपैकी तिघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी चौधरी यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. फिर्यादी यांनी व्यवहारातील सर्व रक्कम चौधरी याला माघारी दिली आहे. मात्र, तरी देखील आरोपी फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते.

दरम्यान, बुधवारी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांना आरोपी बाळा वाघेरे यांच्या घरी नेले. तेथे नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे देतो, असे सांगून तेथून स्वतःची सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील तक्रारीवरून बाळा वाघेरे याला राहत्या घरातून ताब्यात घेतले.