शुटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आजकाल बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन्सचा भरणा पाहायला मिळतो. हे सीन शूट करण्यासाठी कलाकारांचा डमी अॅक्टरचा वापर केला जातो. मात्र अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे जो फार कमी वेळा डमी अॅक्टरचा वापर शुटिंगच्या वेळी करतो. आता स्कॉटलंडमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयचा अपघात झाला आहे.
अक्षय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत टायगर श्रॉफ दिसणार आहे. चित्रपटातील एका अॅक्शन सीनचे चित्रीकरण करताना अक्षयचा अपघात झाला आहे. मात्र त्याला गंभीर दुखापल झाली नसल्याचे समोर आले आहे. स्पेशल ऍक्शन सीक्वेन्सचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. परंतु अक्षय क्लोज-अप शॉट्ससह शूटिंग सुरु ठेवणार आहे.
हिंदुस्तान टाइम्साला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत एका अॅक्शन सीनचे चित्रीकरण करत होता. त्यावेळी एक स्टंट करताना त्याला दुखापत झाली. सध्या त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. स्कॉटलंडमधील शूटिंग वेळेवर पूर्ण व्हावे म्हणून अक्षय क्लोज-अप्ससह शूट करत आहे. मात्र सध्या चित्रपटातील महत्वाच्या अॅक्शन सीनचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे."
'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात अक्षय आणि टायगरसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'टायगर जिंदा है', 'सुलतान', 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'भारत' आणि 'गुंडे' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या स्कॉटलंडमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.