Google Mapचं नवीन फीचर्स लाँच! पेट्रोल, डिझेलची होणार बचत

Google Mapचं नवीन फीचर्स लाँच! पेट्रोल, डिझेलची होणार बचत

गुगल मॅपवरुन आपण सहज सोप्या मार्गाने प्रवास करु शकतो. अशातच Google च एक नवीन फीचर्स लाँच झालं आहे. या फीचर्सद्वारे प्रवास करण आणखी सोपं होणार आहे. कंपनीने नुकतेच Fuel Saving फीचर्स लाँच केले आहे.

प्रवासी या फीचर्सचा वापर करुन इंधनाची बचत किती होते ते पाहू शकणार आहेत. हे फीचर्स मार्ग, रहदारी, रस्त्याची स्थिती आणि किलोमीटर कॅलक्युलेट करेल. जर तुम्हाला गुगल मॅपचा आधार घेऊन एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला गुगल मॅपमध्ये ३ मार्गांचे पर्याय मिळणार आहेत. त्यातील तुम्ही जो मार्ग निवडाल त्यातून इंधनाची किती बचत होईल हे दिसणार आहे.

अशाप्रकारे करा Fuel Saving फीचर्सचा वापर :

  • सर्वप्रथम फोनमध्ये गुगल मॅप्स ओपन करा.
  • त्यानंतर प्रोफाइल पिक्चर आयकॉनवर क्लिक करा.
  • त्यानंतर सेटिंग्समध्ये आणि नेव्हिगेशनवर क्लिक करा.
  • यानंतर Route पर्याय स्क्रोल करा.
  • त्यानंतर Prefer fuel Efficient Routes ऑन करा.