यंदा राज्यात मॉन्सून सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता - ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

यंदा राज्यात मॉन्सून  सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता - ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे

  पुणे, (प्रबोधन न्यूज)  -  यंदा राज्यात मॉन्सून काळात (जून ते सप्टेंबर) या कालावधीत सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, या अंदाजात ५ टक्के कमी-जास्त इतकी तफावत होऊ शकते. तर मध्य आणि पूर्व विदर्भ वगळले तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडेल.

त्यामुळे कमी पावसाच्या पट्ट्यातील कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये येणारी पिके घेण्यावर भर द्यावा, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आणि ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मॉन्सूनची राज्यातील व जिल्ह्यातील स्थिती तसेच याच्या आधारावर कृषी क्षेत्रातील नियोजन याबाबत डॉ. साबळे यांनी माहिती दिली. स्थानिक ठिकाणच्या ‘पाऊस अंदाज’ या मॉडेलच्या आधारावर त्यांनी ही माहिती दिली आहे.

हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या घटकांवर आधारित आहे. या वेळी डॉ. साबळे म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा ९४ टक्के पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे पाण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानबदलाचा परिणाम मॉन्सूनवरही होताना दिसून येत आहे. यंदा उन्हाळी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने हंगामात कमाल तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी कमी होते. यंदा राज्यात १० जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.’’