महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघा तर्फे ऊस विकास परिषदेचे आयोजन

महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस शेती करणारे शेतकऱ्यांची स्थिती बरीचशी नाजूक झाली असून ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघा तर्फे ऊस विकास परिषदेचे आयोजन

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय "ऊस विकास परिषद " रविवार दिनांक १२/०३/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत आर. के. मंगल कार्यालय, बामणी, कागल ते मुरगुड रोड, एन. एच. ४ पासून १३ किमी (बामणी), ता. कागल जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुल (नाना) माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस शेती करणारे शेतकऱ्यांची स्थिती बरीचशी नाजूक झाली असून ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ऊस शेतीतील विचारवंत आणि ऊस शेतीशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येवून या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली असून या गरजेची पुर्तता करण्यासाठीच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाने राज्यस्तरीयत ऊस विकास परिषदेचे आयोजन केलेले आहे. सदर ऊस परिषदेत आधुनिक ऊसपिक तंत्रज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार असून श्री. संजीवदादा माने हे एकरी १०० टन सहज शक्य' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर ऊस विकास अधिकारी श्री. उत्तमराव परीट (कोरे) हे आदर्श ऊस शेती' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्री. संतोष सहाणे हे सेंद्रीय शेती' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. श्री. शामकांत पाटील साहेब हे ' ऊस पिक ठिबक सिंचन कार्य व महत्व ' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्री. सत्यजित भोसले यांचे देखील मार्गदर्शन राहील.

तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील ऊस परिषदेस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुलनाना माने पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी श्री. अतुल मस्के, श्री. किरणभाऊ चव्हाण, श्री. उत्तम परीट श्री. राजेंद्र डुचे पाटील, श्री. कृष्णात पाटील, श्री. सचिन पाटील, श्री. कृष्णात पाटील कडेगाव, श्री. अमोल खोत, श्री. प्रकाश बाबुराव यादव आदी उपस्थित होते.