अखेर सात महिन्यांनी परमबीर सिंग मुंबईत ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अखेर सात महिन्यांनी परमबीर सिंग मुंबईत ! 
मुंबई -  
मुंबईसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग आज सकाळी (दि. २५)  मुंबईत दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने ते तात्काळ पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह फरार होण्यापूर्वी ते राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदावर होते. मात्र त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर ते गायब झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरी संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. या पदावर अद्याप राज्य सरकारने कुणाचीही नियुक्ती केली नाही. त्यामुळे परमवीर सिंह यांचा पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा आहे. लवकरच ते आपल्या पदाची जबाबदारी स्वीकरण्याची शक्यता आहे.

परमवीर सिंह यांच्यावर सहा डिसेंबरपर्यंत अटकेची कारवाई करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशानंतर परमबीर सिंग बुधवारी सोशल मीडियावर आले. सात महिन्यांपासून बंद असलेला त्यांचा मोबाइल सुरु झाला.

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्याकांडानंतर परमीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुट्टीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवून देखील ते हजर राहात नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर काल बुधवारी तब्बल सात महिन्यानंतर ते रेंजमध्ये आले.