कसबा व चिंचवडमध्ये शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याने नेतेही नाराज
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे/पिंपरी (प्रबोधन न्यूज) – कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेनेला महाविकास आघाडीकडून एकही उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत नेतेही नाराज असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. संपर्कप्रमुख असूनही माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही, म्हणून मी देखील नाराज असल्याचं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. सचिन आहिर यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
सचिन आहिर पुढे म्हणाले की, जर भाजपच्या जागेवर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल तर मग आम्ही उमेदवारी कुठे मागायची? मी चेतन तुपे आणि सुनील शेळके यांना देखील हेच विचारलं. जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे उमेदवारी मिळेल ही आमची अपेक्षा आहे, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे.
मात्र महाविकास आघाडी म्हणून भाजपला दूर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. आम्हाला आणि आमच्या शिवसेना पक्षाला संपावण्याची भाषा ज्या भाजपने केली आहे. आमच्या पक्षात फूट पाडून चिन्ह गोठवण्याचा प्रकार करणाऱ्या पक्षाला हरवण्यासाठी दोन पावलं मागे घेण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
सचिन आहिरच जर नाराज असतील तर कार्यकर्त्यांची भावना वेगळी असू शकत नाही. त्यामुळेच दोन्ही पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या नाराजीचा फटका बसू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.