भाजपाकडून गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ, पुन्हा रुग्णालयात तातडीने दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपाकडून गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ, पुन्हा रुग्णालयात तातडीने दाखल

भाजपने गंभीर आजारी गिरीश बापटांना प्रचारात उतरवले; सोशल मीडियावर प्रचंड टीका

पुणे (प्रबोधन न्यूज) – कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी गंभीर आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना मैदानात उतरवले. त्यानंतर त्यांची पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे सोशल मीडियात भाजपवर टीका होताना दिसत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आजारी असताना देखील हेमंत रासने यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पण त्यावेळी गिरीश बापट यांना बोलताना होणारा त्रास, तर नाकात ऑक्सिजनची नळी आणि बाजूला सिलेंडर देखील होता. अशा स्थितीत त्यांना प्रचाराला कामाला लावल्याने कसबा मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.

फेसबुक वरून एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात गिरीश बापट यांचा फोटो आहे सोबत पुढील मजकूर आहे.

मोदींचा करिष्मा ही नाही चालणार पुणे कासब्यात!!!

आयुष्यापेक्षा सत्तांध राजकारणाला जास्त महत्त्व आले आहे.

सत्ताकांक्षी भाजपने मरणच स्वस्त केले आहे.

गंभीर आजारी असताना भाजपने मनोहर पर्रीकर यांना निवडणूक प्रचारात उतरविले होते.

अंगात बळ उरलेले नसताना त्यांना हाऊ इज द जोश म्हणायला लावले होते.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दिवंगत आमदार मरणाशी झुंजत असताना

भाजपने त्यांना विधानपरिषद निवडणुक मतदानासाठी आणले होते.

आज पुन्हा एकदा भाजपने संवेदनाहीनतेचा कळस केला.

गिरीश बापट गंभीर आजारी असताना त्यांना भाजपने पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले

त्यांच्या प्रकृतीशी भाजप खेळ करीत आहे

सत्तेसाठी इतका स्वार्थीपणा बरा नव्हे

 गिरीश बापट यांनी पत्रक काढून आपण कसब्याच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांच्या आग्रहाखातर गिरीश बापट यांनी केसरीवाडा येथील मेळाव्याला उपस्थिती लावली होती. परंतु, यामुळे गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने चिंता वाढली आहे.

गिरीश बापट यांना सध्या आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे बापट सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. परंतु, काल त्यांनी पक्षासाठी कसब्याच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, आज लगेच त्याचा परिणाम झाला असून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष गिरीश बापट यांच्या प्रकृतीकडे लागले आहे. अद्याप डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.