शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम ? राज्यातील प्रमुख शहरात शाळा सुरू होणार 'या' दिवशी !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
० पुणे
पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून १५ डिसेंबरला एकूणच आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल. पुणेकर पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.
० नागपूर
नागपुरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 10 डिसेंबरपर्यंत सुरु होणार नाही. तशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. 10 तारखेनंतर आढावा घेऊन हा निर्णय घेतला जाणार आहे. महापालिका हद्दीतील शाळा 10 डिसेंबरनंतर सुरु होण्याची शक्यता आहे.
० औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम कायम आहे. ग्रामीण भागातील शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. तर औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याबाबत 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहिली जाणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरु करण्याबाबत हा निर्णय घेतला जाणार आहे. 10 तारखेला परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.
० नाशिक
नाशिक जिल्ह्यात शाळांबाबत 10 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाणार आहे. पहिली लाट येत असताना जी काळजी घेतली गेली तशाच पद्धतीने काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
० सोलापूर
सोलापूर शहरातील प्राथमिक शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर पालिका आयुक्तांनी उशिरा निर्णय घेतला. शहरातील 368 शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. सकाळी 11 वाजाता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग उद्या सुरु होणार आहे. तसे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.
वाशिम जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून शहरी भागातदील 1 ली ते 7 वी आणि ग्रामीण भागातील 1 ली ते 5 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरु करण्याची तयारी झाली आहे. पालकांनीही मुलांना शाळेत जाण्यासाठी सहमती पत्र दिले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील एकूण 1 हजार 342 शाळा उघडल्या आहेत.